तिसगाव येथेही मिळणार कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:50+5:302021-03-06T04:20:50+5:30
तिसगाव : तिसगाव (ता. पाथर्डी) येथील श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २५० रुपयांमध्ये कोरोना लस मिळणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक ...

तिसगाव येथेही मिळणार कोरोना लस
तिसगाव : तिसगाव (ता. पाथर्डी) येथील श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २५० रुपयांमध्ये कोरोना लस मिळणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. समर रणसिंग, डॉ. प्रेरणा रणसिंग यांनी दिली. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी कोरोना लसीकरण केंद्र या ठिकाणी सुरू केले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात साठ वर्षांच्या पुढील वयोमान असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळणार आहे.