अरणगाव दुमाला येथे १५१ जणांचे कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:16 IST2021-06-05T04:16:08+5:302021-06-05T04:16:08+5:30
ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथे ४५ वर्षांपुढील १५१ नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी ...

अरणगाव दुमाला येथे १५१ जणांचे कोरोना लसीकरण
ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथे ४५ वर्षांपुढील १५१ नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी नितीन खामकर यांचे सहकार्य लाभले.
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र कष्ट घेतात. त्यांच्या रुपाने परमेश्वराचेच दर्शन घडत आहे, असे मत उद्योजक मोहन आढाव यांनी यावेळी व्यक्त केले.
लसीकरणासाठी येथे नागरिकांनीही शिस्तीचे पालन केले. नागरिकांची अगोदर ऑनलाईन नोंदणी केली गेली. त्यानंतर रॅपिड, आरटीपीसीआर चाचणी करूनच लसीकरण करण्यात आले. गावातील स्वयंसेवकांनी ऑनलाईन नोंदणीस सहकार्य केले. विक्रम सातव, संदीप शिंदे, बाळासाहेब दिवटे, बापू सातव, स्वप्निल दिवटे, माऊली चव्हाण आदी युवकांनी मदत केली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी तब्बसुम पठाण, पर्यवेक्षक डी. बी. गोधडे, ढवळगाव उपकेंद्रातील आरोग्यसेविका एम. आर. मापारी, एस. आर. चव्हाण, आरोग्यसेवक एस. बी. गायकवाड, मदतनिस, आशा कर्मचारी रणदिवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
----
०४ ढवळगाव
अरणगाव दुमाला येथे कोरोना लसीकरणप्रसंगी उद्योजक मोहन आढाव यांनी मार्गदर्शन केले.