आमदार लंके यांना कोरोना केसरी किताब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST2021-05-15T04:20:04+5:302021-05-15T04:20:04+5:30
भाळवणी : कोरोनाच्या काळात आपल्या मतदारसंघातील जनतेला नव्हे तर जिल्ह्यातील जनतेला शरदचंद्र पवार कोविड सेंटरच्या माध्यमातून दिलासा दिला आहे. ...

आमदार लंके यांना कोरोना केसरी किताब
भाळवणी : कोरोनाच्या काळात आपल्या मतदारसंघातील जनतेला नव्हे तर जिल्ह्यातील जनतेला शरदचंद्र पवार कोविड सेंटरच्या माध्यमातून दिलासा दिला आहे. आमदार लंकेंसारख्या आमदारांची राज्यातील प्रत्येक मतदारसंघाला गरज असल्याचे मत हिंद केसरी संतोष वेताळ यांनी व्यक्त केले.
सुर्ली, कराड (जि.सातारा) येथील हिंदकेसरी फाउंडेशनने पहिलवान संतोष वेताळ यांच्या हस्ते आमदार नीलेश लंके यांचा भाळवणी (ता. पारनेर) येथे कोरोना केसरी किताबासह अडीच किलो चांदीची गदा, एक लाख रुपयांचा धनादेश, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी नवनाथ पाटील, सुर्ली गावचे सरपंच दत्तात्रय वेताळ, समाजसेवक निसार मुल्ला, पहिलवान सोनू मदने, माजी उपसरपंच कृष्णत मदने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, सरपंच राहुल झावरे, उद्योजक सुरेश धुरपते, शरद झावरे, बाळासाहेब खिलारी, सत्यम निमसे, पिंटू गोडसे, दत्ताभाऊ कोरडे, बाळासाहेब लंके, अभयसिंह नांगरे, भाऊ चौरे, सूनील टोपले, वसंत दातीर, बाळासाहेब ब्राह्मणे, संदीप चौधरी, अक्षय खिलारी उपस्थित होते.
----
गुरूसाठी बनविलेली गदा मिळाली शिष्याला..
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसासाठी हिंद केसरी संतोष वेताळ यांनी अडीच किलो चांदीची गदा बनविली होती. परंतु, कोरोना काळ सुरू असल्याने शरद पवार यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे राज्यात कोरोना काळात आदर्श काम उभे केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांना शरद पवार यांच्यासाठी बनविलेली चांदीची गदा दिली आहे. त्यामुळे गुरूसाठी बनविलेली अडीच किलो चांदीची गदा शिष्याला (आमदार लंके) दिली असल्याचे वेताळ यांनी यावेळी सांगितले.
---
१४ भाळवणी लंके
भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये आमदार नीलेश लंके यांचा हिंद केसरी फाऊंडेशनच्या वतीने कोरोना केसरी किताबाने सन्मान करताना हिंद केसरी संतोष वेताळ.