‘लाेकमत’मध्ये वृत्त येताच भिंगाणमध्ये कोरोना तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:21+5:302021-06-20T04:16:21+5:30
श्रीगोंदा : १८ जूनच्या ‘लोकमत’च्या अंकात भिंगाण येथे आराेग्य विभागाचे दुर्लक्ष अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य विभागाने भिंगाण ...

‘लाेकमत’मध्ये वृत्त येताच भिंगाणमध्ये कोरोना तपासणी शिबिर
श्रीगोंदा : १८ जूनच्या ‘लोकमत’च्या अंकात भिंगाण येथे आराेग्य विभागाचे दुर्लक्ष अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य विभागाने भिंगाण गावामध्ये शुक्रवारी कोरोना चाचणी शिबिर घेतले.
यावेळी ४९ व्यक्तींच्या तपासणीत ३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. १५ व्यक्तींच्या घशातील नमुने घेण्यात आले. या संदर्भात ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते.
या शिबिरास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन
खामकर यांनी भेट दिली.
चोराचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच परसराम लांडगे, ग्रामपंचायत सदस्य अजिनाथ आमटे, सदस्य अनिता घोलवड, संभाजी ब्रिगेडचे नाना शिंदे, ग्रामस्थ उपस्थित होते.
पहिल्या दिवशी प्रदीप खंडागळे, दत्ता खंडागळे, शेखर साळुंखे, संदीप बोराडे यांनी गावात फवारणीचे काम केले. दुसऱ्या दिवशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अँटिजन टेस्ट केल्या. रविवारी ४५ वर्षांपुढील ग्रामस्थांचे कोरोना लसीकरण होणार आहे.