‘रत्नदीप’कडून शासकीय कार्यालयांना कोरोना गार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:54+5:302021-06-05T04:15:54+5:30
जामखेड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी प्रशासन व सामाजिक संस्थांकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार जामखेड ...

‘रत्नदीप’कडून शासकीय कार्यालयांना कोरोना गार्ड
जामखेड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी प्रशासन व सामाजिक संस्थांकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार जामखेड तालुक्यातील रत्नापूरच्या रत्नदीप मेडिकल फाउंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटरमार्फत एक अनोखा उपक्रम राबविला आहे. या संस्थेमार्फत कोरोनाचा विषाणू निष्क्रिय करणारे कोरोना गार्ड शासकीय कार्यालयांना भेट देऊन कार्यान्वित करण्यात आले आहेत.
रत्नदीप मेडिकल फाउंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत संस्थेच्या नर्सिंग, फार्मसी व होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या शैक्षणिक संकुलासह जामखेडचे तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालयात एका नामांकित कंपनीची कोरोना गार्ड यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
या वेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे, सचिव डॉ. वर्षा मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे, सलीम बागवान, शरद ढवळे, विशाल गर्जे, राहुल उगले आदी उपस्थित होते.
यापूर्वीही कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात स्थानिक प्रशासनाने संस्थेच्या शैक्षणिक संकुलात संस्थेच्या सहकार्याने कोविड केअर सेंटर सुरू केले होते, असे डॉ. भास्कर मोरे व डॉ. वर्षां मोरे यांनी सांगितले.
--
०४ जामखेड मदत
रत्नदीप मेडिकल फाउंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने शासकीय कार्यालयात बसविण्यासाठी नामांकित कंपनीचे कोरोना गार्ड यंत्र प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांनी सुपुर्द केले.