कर्जतमध्ये कोरोना जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:28 IST2021-02-26T04:28:24+5:302021-02-26T04:28:24+5:30
कर्जत : कर्जत तालुका पत्रकार संघ व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी कर्जत शहरात कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मोहीम ...

कर्जतमध्ये कोरोना जनजागृती
कर्जत : कर्जत तालुका पत्रकार संघ व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी कर्जत शहरात कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली.
शहरातील मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कापड बाजार, युनियन बँक, बाजारतळ, म्हसोबा गेट, कोर्ट रस्ता या भागात फिरून व्यापारी बांधव, ग्राहक, पादचारी, युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कर्जत येथे कर्मचारी व ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे, उपाध्यक्ष आशिष बोरा, सचिव नीलेश दिवटे, गणेश जेवरे, मच्छिंद्र अनारसे, सुभाष माळवे, नय्युम पठाण, अफरोज पठाण, वाहतूक शाखेचे सहायक फौजदार बाळासाहेब यादव, पोलीस कर्मचारी गोवर्धन कदम, ईश्वर नरुटे, बळीराम काकडे आदी सहभागी झाले होते.