कोरोनाचे ६२ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:03 IST2021-01-08T05:03:30+5:302021-01-08T05:03:30+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी ६२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले, तर १५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ८८६ जणांवर ...

Corona 62 new patients | कोरोनाचे ६२ नवे रुग्ण

कोरोनाचे ६२ नवे रुग्ण

अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी ६२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले, तर १५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ८८६ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ११, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २९ आणि अँटिजन चाचणीत २२ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (१७), जामखेड (१), कर्जत (१), कोपरगाव (६), नगर ग्रामीण (९), नेवासा (१), मिलिटरी हॉस्पिटल (१), पारनेर (३), राहाता (१३), राहुरी (३), श्रीगोंदा (१), संगमनेर (१), श्रीरामपूर (५) अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६७ हजार ५९४ इतकी झाली आहे, तर आतापर्यंत १ हजार ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्ण संख्या ही ६९ हजार ५३६ इतकी झाली आहे.

Web Title: Corona 62 new patients