शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सहकार घोटाळा दबणार नाही, कारवाई होणारच, सरकार बदलले तरीही फरक नाही - प्रकाश आंबेडकर

By शिवाजी पवार | Updated: August 10, 2023 13:12 IST

  आंबेडकर म्हणाले, केंद्र सरकारने नामार्डच्या माध्यमातून पैसे दिले होते. त्यामुळे केंद्राने ४८ हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण केली आहे. केवळ सहकार विभागाने ही बाब मान्य केलेली नाही. मात्र उद्या केंद्रात कोणतेही सरकार आले तरीही कायद्याने कारवाई थांबणार नाही.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : सहकारातील ४८ हजार कोटी रुपयांचा घोटाळ्यात नाबार्डची चौकशी पूर्ण झाली आहे. केंद्रात कोणतेही सरकार आले तरीही सरकारमध्ये सामील झालेल्या राज्यातील नेत्यांवरील कारवाई अटळ आहे, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला. तुर्तास अटकेपासून बचाव करण्यासाठी हे नेते भाजपबरोबर गेले असून त्यात नगर जिल्ह्यातील नेत्यांचाही समावेश असल्याचे ते म्हणाले. येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी संध्याकाळी उशिरा आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. देशात लवकरच लोकसभेची निवडणूक जाहीर होईल, असे भाकित त्यांनी यावेळी केले.आंबेडकर म्हणाले, केंद्र सरकारने नामार्डच्या माध्यमातून पैसे दिले होते. त्यामुळे केंद्राने ४८ हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण केली आहे. केवळ सहकार विभागाने ही बाब मान्य केलेली नाही. मात्र उद्या केंद्रात कोणतेही सरकार आले तरीही कायद्याने कारवाई थांबणार नाही.राज्यात शिवसेनेच्या बळावरच भाजपला ग्रामीण मतदारांवर प्रभाव टाकता येत होता. त्यामुळे दोन्ही पक्ष निवडणुकांमध्ये विजयी झाले. आता मात्र भाजपकडे कोणतेही प्रभावशाली नेतृत्व राहिलेले नसून हा पक्ष येत्या विधानसभेला सपाटून मार खाणार आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला.अजित पवार ५ टक्केही नाहीतज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तुलनेत अजित पवार यांची क्षमता पाच टक्के सुद्धा नाही. शरद पवार यांनी सन्मानाने राजकारणातून निवृत्त व्हायला हवे, असे मानणारा मोठा वर्ग आहे. तो अजित पवार यांना कधीही स्वीकारणार नाही, असे आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्रVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी