कर्जत-जामखेडसाठी कुकडीचे आवर्तन

By Admin | Updated: August 1, 2014 00:22 IST2014-07-31T23:27:32+5:302014-08-01T00:22:22+5:30

कर्जत : कर्जत-जामखेड-करमाळा तालुक्यांना पिण्यासाठी कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तनातून तलाव भरुन घेण्यात येणार आहेत. पाणी चोरी टाळण्यासाठी सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Cooked rotation for Karjat-Jamkhed | कर्जत-जामखेडसाठी कुकडीचे आवर्तन

कर्जत-जामखेडसाठी कुकडीचे आवर्तन

कर्जत : कर्जत-जामखेड-करमाळा तालुक्यांना पिण्यासाठी कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तनातून तलाव भरुन घेण्यात येणार आहेत. पाणी चोरी टाळण्यासाठी सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पावसाने दडी मारल्याने कर्जत तालुक्यात टंचाईस्थिती आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तनातून थेरवडी, दूरगाव, पाटेवाडी, राक्षसवाडी हे तलाव व सीना धरण भरण्यात येणार आहे.
तसेच जामखेड तालुक्यातील चौंडी येथील बंधारा भरण्यात येणार आहे. करमाळा तालुक्यातील वीट तसेच कुंभेज तलावात पाणी सोडण्यात आले आहे.
सोडलेल्या आवर्तनातून पाण्याची चोरी होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सहा पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांना कारवाईचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. पाणी उपसा होऊ नये यासाठी तलाव परिसरातील वीज पंपांचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. पाणी चोरी होताना आढळल्यास पंप व इतर साहित्य जप्त करण्यात येणार आहे.
(तालुका प्रतिनिधी)
प्रशासनाचे आवाहन
पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने कुकडीच्या आवर्तनातून तलाव भरण्यात येणार आहेत. नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेस सहकार्य करावे.
जयसिंग भैसडे
तहसीलदार, कर्जत

Web Title: Cooked rotation for Karjat-Jamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.