मोदींविषयी व्देष नाही, माझा धोरणांना विरोध : शत्रुघ्न सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 13:33 IST2019-03-24T13:33:41+5:302019-03-24T13:33:58+5:30

माझ्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी द्वेष नाही. माझा केवळ त्यांच्या धोरणांना विरोध आहे. तसेच माझे कुणाशी शत्रुत्व नाही.

Controversy about Modi, Shatrughan Sinha | मोदींविषयी व्देष नाही, माझा धोरणांना विरोध : शत्रुघ्न सिन्हा

मोदींविषयी व्देष नाही, माझा धोरणांना विरोध : शत्रुघ्न सिन्हा

नेवासा : माझ्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी द्वेष नाही. माझा केवळ त्यांच्या धोरणांना विरोध आहे. तसेच माझे कुणाशी शत्रुत्व नाही. मला राजकारण करायचे नसून समाजासाठी काम करायचे. राष्ट्रहीत सर्वप्रथम असून खरं बोलण्यासाठी मी कधीही घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार व सिनेअभिनेते शत्रुन्घ सिन्हा यांनी शनी शिंगणापूर येथे शनी दर्शनानंतर बोलतांना दिली.
अभिनेते खासदार शत्रून्घ सिन्हा यांनी पत्नीसह काल रात्री शनी शिंगणापूर येथे आले. अभिषेक करून चौथ-यावर जाऊन दर्शन घेतले. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात विश्वस्त दीपक दरंदले यांनी त्यांचा सन्मान केला.
सिन्हा म्हणाले, मी स्पष्टपणे बोलतो. राष्ट्रहिताचे बोलतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत. आज ते पंतप्रधान आहेत तर उद्या दुसरं कोणी असेल. माझ्या मनात नरेंद्र मोदी यांच्याविषयी द्वेष नाही. शेतकरी, जीएसटी, नोटबंदी, बेरोजगार तरुण यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने मी आवाज उठवला आहे. ज्या नीती चुकल्या, त्याबाबत मी आवाज उठवला आहे. जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना मार्गदशक मंडळमध्ये टाकले. अशा विविध मुद्यांवर त्यांनी सडेतोड टीका केली.

 

 

Web Title: Controversy about Modi, Shatrughan Sinha