शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2024 11:05 IST

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर पुन्हा ठिय्या आंदोलनाला सुरुवात.

लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : युवा संकल्प मेळाव्याअंतर्गत शुक्रवारी (दि.२५) रात्री तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांची सभा पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल सभेत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे संगमनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्री १० वाजता संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर सुरू झालेले आंदोलन सकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर येथेच शनिवारी सकाळी १० वाजता पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सुजय विखे-पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. 

शुक्रवारी रात्री उशिरा आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात यांचे समर्थक धांदरफळ बुद्रूक येथील बाजारतळ परिसरात मोठ्या संख्येने जमले होते. यात महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. डॉ. विखे-पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण होते. त्या भाषणात त्यांनी डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे पूर्णपणे चुकीचे आणि अशोभनीय आहे. असेही महिलांनी बोलताना सांगितले.देशमुख यांना येथे आणा ; महिला आक्रमक

धांदरफळ बुद्रुक येथे ज्या ठिकाणी सभा झाली, त्याच व्यासपीठावर आमदार थोरात समर्थक हे रात्री उशिरा एकत्र जमले होते. त्यांनी वसंतराव देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यांना येथे आणा, त्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही. असा पवित्रा महिलांनी घेतला होता. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन सुरू झाले, हे आंदोलन सकाळी सव्वासहा वाजेपर्यंत सुरू होते. पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली आहे.वाहन जाळले ; वाहनांची तोडफोड

शहरातील अकोले नाका परिसरात लावण्यात आलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांचे फलक फाडण्यात आले. चिखली येथे एक चारचाकी वाहन जाळण्यात आले. इतरही ठिकाणी काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangamner-acसंगमनेरSujay Vikheसुजय विखे