विकासकामांसाठी गडाख यांचा सातत्याने पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:26 IST2021-09-04T04:26:13+5:302021-09-04T04:26:13+5:30
घोडेगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातले मंत्री म्हणून त्यांची ओळख म्हणून शंकरराव गडाख यांची ओळख आहे. मात्र, तरीही ...

विकासकामांसाठी गडाख यांचा सातत्याने पाठपुरावा
घोडेगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातले मंत्री म्हणून त्यांची ओळख म्हणून शंकरराव गडाख यांची ओळख आहे. मात्र, तरीही मंत्रिपदाची हवा डोक्यात जाऊ न देता गडाख यांचा विकास कामांसाठी पाठपुरावा सुरू असतो. नेवासा तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सातत्याने आग्रही असतात. त्यामुळे नेवाशासह जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
घोडेगाव ते सोनई या ८ किमी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि.३) रोजी सायंकाळी ५ वाजता शनिचौक घोडेगाव येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते व मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत झाले. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. कोरोना नियमाचे पालन करत कमी लोकात हा कार्यक्रम झाला.
घोडेगाव येथील रस्त्याचे भूमिपूजन झाल्यावर सोनई येथील मुळा शैक्षणिक संस्थेच्या आमराई विश्रामगृहात नगर जिल्ह्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांची शिवसवांद बैठक आयोजित केली होती. शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, अर्थ, पशुसंवर्धन समिती सभापती सुनील गडाख, सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, मुळाचे चेअरमन नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. शिवाजीराव शिंदे, बाळासाहेब सोनवणे, दिलीपराव लोखंडे, मच्छींद्र म्हस्के, हरिभाऊ शेळके, मच्छींद्र धुमाळ, संदेश कार्ले, संभाजी कदम, दिलीप सातपुते, योगीराज गाडे, राजेंद्र गवळी, बाबूशेठ टायरवाले, नानासाहेब रेपाळे, सुहास गोंटे, वसंत सोनवणे, अशोक येळवंडे, पंकज लांभाते, महावीर नहार,डॉ. सुनील वैरागर, दगडू इखे, अरुण जाधव, भास्कर जाधव, दत्तात्रय बऱ्हाटे उपस्थित होते.
..........
पांढरीपूल एमआयडीसीचे प्रश्न सोडविणार
नेवासा तालुक्याच्या विकासकामांत ना सुभाष देसाई यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. पुढील काळात उद्योगमंत्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरी पूल एमआयडीसीचा कायापालट करून नवीन उद्योग, व्यवसाय आणून तालुक्याच्या विकासात सहकार्य करावे, असे आवाहन गडाख यांनी केले. त्यावर देसाई यांनी पांढरी पूल एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग, व्यवसाय आणण्याचा प्रयत्न करू. तेथील प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.