वळणमध्ये होतोय दूषित पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST2021-04-09T04:21:39+5:302021-04-09T04:21:39+5:30
वळण येथील कानडे फाटा, सोनार फाटा, मळहद्दी कार्ले फाटा या ठिकाणी दूषित पाणी आले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर ...

वळणमध्ये होतोय दूषित पाण्याचा पुरवठा
वळण येथील कानडे फाटा, सोनार फाटा, मळहद्दी कार्ले फाटा या ठिकाणी दूषित पाणी आले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ग्रामसेवक यांनी मूळ समस्येकडे लक्ष न देता उलट सवाल केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मृत पक्षी आढळून आले होते. त्यावेळी पिण्याच्या पाण्याची टाकी धुण्यात आली होती. त्यानंतर ही टाकी देखील धुण्यात आली नसल्याचा देखील आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या मुळा धरणात मुबलक पाणीसाठा आहे. पाणीपट्टीत देखील वाढ झाली आहे. पाण्याची टाकी देखील एक नवीन झाली आहे. एक कर्मचारी देखील वाढला आहे.
तरी देखील दिवसाआड पाणीपुरवठा त्याचे देखील योग्य नियोजन का नाही असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
.............
पाणीप्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलन
आठ दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर कुठलीही पूर्वसूचना न देता ग्रामसेवकाच्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा धनंजय आढाव, माजी उपसरपंच राजू मकासरे, भारत कुर्हे, किशोर कुर्हे, सोमनाथ कार्ले, रामहरी कार्ले, दादा ठोंबरे, सुमन कानडे, विकास गोसावी, पप्पू मकासरे, संतोष डमाळे, बापूसाहेब काळे, दीपक गोसावी यांनी दिला आहे.
...........
गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या ही गेल्या काही दिवसापासून आहे. समस्या सोडवू असे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते पण आता त्यांना त्याचा विसर पडला आहे. तत्काळ ही समस्या मार्गी लागली नाही तर कुठलीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.
- धनंजय आढाव, सामाजिक कार्यकर्ते
................
सकाळी अनेक नागरिकांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून वारंवार अशा समस्या होत असल्याचे लक्षात आणून दिले. याबाबत ग्रामसेवक संतोष राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ‘या बाबत मला काहीच माहिती नाही, बघू उद्या आल्यावर’ अशी प्रतिक्रिया दिली.
०८ पाणी