दुभाजकावर कंटेनर धडकला

By Admin | Updated: April 18, 2017 17:51 IST2017-04-18T17:51:18+5:302017-04-18T17:51:18+5:30

अहमदनगर-मनमाड महामार्गावर राहाता शहराजवळ मंगळवारी पहाटे मालवाहू कंटेनर रस्ता दुभाजकावर चढून झालेल्या अपघातात कंटनेरसह एका मालट्रकचे नुकसान झाले.

Container shock on the divider | दुभाजकावर कंटेनर धडकला

दुभाजकावर कंटेनर धडकला

हाता : अहमदनगर-मनमाड महामार्गावर राहाता शहराजवळ मंगळवारी पहाटे मालवाहू कंटेनर रस्ता दुभाजकावर चढून झालेल्या अपघातात कंटनेरसह एका मालट्रकचे नुकसान झाले.पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. राहाता शहराकडून शिर्डीकडे हा कंटनेर (क्रमांक यु. के. ०४/सी. ए. ९४६६) चालला होता. तर मालट्रक (क्रमांक एच. आर. ५५/एच ४२४६) शिर्डीकडून अहमदनगरकडे जात होता. पहाटे चारच्या सुमारास कंटनेर चालकाला डुलकी लागल्याने कंटनेर अचानक महामार्ग सोडून रस्ता दुभाजकावर चढला. त्याचवेळी शिर्डीकडून अहमदनगरकडे ट्रक जात होता. त्यावर दुभाजकावर चढलेल्या कंटनेरचा समोरील काही भाग धडकला. यात दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचे काही प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Web Title: Container shock on the divider