पोलीस ठाण्याच्या आवारातच कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न
By अण्णा नवथर | Updated: August 10, 2024 23:46 IST2024-08-10T23:46:37+5:302024-08-10T23:46:58+5:30
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील प्रकार

पोलीस ठाण्याच्या आवारातच कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न
अहमदनगर : पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जगताप यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल. हा प्रकार शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात घडला . त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ,भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत कॉन्स्टेबल जगताप यांची विचारपूस केली . रात्री उशिराने त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.