काँग्रेसला बदनाम करण्याचे षड्यंत्र

By Admin | Updated: December 19, 2015 23:51 IST2015-12-19T23:44:19+5:302015-12-19T23:51:02+5:30

अहमदनगर : नॅशनल हेरॉल्डप्रकरणी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याची मोहीम मोदी सरकारने चालवली आहे. हा प्रकार घृणास्पद असून त्याचा निषेध करत मोदी सरकारचे हे हुकूमशाही वागणे सहन केले जाणार नाही,

Conspiracy to defame Congress | काँग्रेसला बदनाम करण्याचे षड्यंत्र

काँग्रेसला बदनाम करण्याचे षड्यंत्र

अहमदनगर : नॅशनल हेरॉल्डप्रकरणी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याची मोहीम मोदी सरकारने चालवली आहे. हा प्रकार घृणास्पद असून त्याचा निषेध करत मोदी सरकारचे हे हुकूमशाही वागणे सहन केले जाणार नाही, अशा शब्दात प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी इशारा दिला. आणीबाणीनंतर पहिल्यांदा गांधी घराण्याला कोर्टाची पायरी चढावी लागली असून त्याचा निषेध एकट्या तांबे यांनी केला, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नगर शहर काँग्र्रेसच्या वतीने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सरकार सूडबुद्धीने वागत असल्याच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी शनिवारी सिद्धीबागेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, माजी नगरसेवक धनंजय जाधव, पियुष लुंकड, मुन्नाशेठ चमडीवाला, शामराव वाघस्कर, आर.आर. पिल्ले, रिजवान ताठे, स्वप्नील दगडे, सुमीत बनसोडे, नलिनी गायकवाड, शारदा वाघमारे, अविनाश ब्राह्मणे, मोबीन शेख, अभिजित कांबळे, अक्षय भिंगारदिवे, राहुल मुथ्था, करण वाकचौरे आदी उपस्थित होते.
तांबे म्हणाले, नॅशनल हेरॉल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यात येत आहे. काँग्रेसचे सर्वोच्च नेते व पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सरकारद्वारा होत आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरण पूर्णपणे राजकीय सूड उगविण्याचा प्रकार आहे. भाजपाच्या या सूडबुद्धीच्या राजकारणाला पक्ष चोख प्रत्युत्तर देईल. हा निषेध मोर्चा फक्त इशारा आहे. यापुढे हे सहन करणार नाही, असा इशारा तांबे यांनी दिला. नगर जिल्ह्यात काँग्रेसचे तीन आमदार असून अनेक दिग्गज नेते आहेत. मात्र, यापैकी कोणीही नॅशल हेरॉल्डप्रकरणी आंदोलन केले नाही.

Web Title: Conspiracy to defame Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.