शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
4
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
5
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
6
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
7
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
8
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
9
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
11
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
12
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
13
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
14
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
15
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
16
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
17
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
18
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
19
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
20
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
Daily Top 2Weekly Top 5

करुणा शर्मा यांच्याबाबत कटकारस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST

अहमदनगर : परळीत गेलेल्या करुणा शर्मा यांच्याबाबतीत रविवारी जी घटना घडली ती एक कटकारस्थान आहे. राज्यातील एखाद्या मंत्र्याकडूनच कुणावर ...

अहमदनगर : परळीत गेलेल्या करुणा शर्मा यांच्याबाबतीत रविवारी जी घटना घडली ती एक कटकारस्थान आहे. राज्यातील एखाद्या मंत्र्याकडूनच कुणावर अन्याय करण्याची भूमिका असेल तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रसारमाध्यमातून घटनेच्या वेळी जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यावरून हे मोठे कारस्थान असल्याचे दिसते, असा आरोप भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला आहे.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी माजी मंत्री राम शिंदे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, भारतात सर्वांना स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल सापडणे हा सुद्धा एक कटच असल्याचे व्हायरल व्हिडिओवरून दिसून येते आहे.

---------

जावेद अख्तर यांचा केला निषेध

जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना करणारे वक्तव्य केले आहे. याकडे लक्ष वेधले असता शिंदे म्हणाले, जावेद अख्तरसारखी माणसे भारतात राहून इतर देशांबद्दल बोलत असतील तर त्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे. दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्रजांना घालवून येथे लोकशाही आणलेली आहे. त्यामुळे येथे कुणी इतर देशांचे दाखले देऊ नयेत. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांसंबंधी न बोललेलेच बरे.

----------

अनिल देशमुखांना आता लाठ्याची भीती

कोरोनाच्या काळात सामान्यांची गर्दी पांगविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख पोलिसांना लाठ्यांना तेल लावून ठेवायला सांगत होते. आता त्यांना त्याच लाठ्यांची भीती वाटत असल्याने ते अटक टाळत असावेत, असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. केंद्रीय मंत्र्याला तात्काळ अटक केली जाते. गुन्हा घडला महाडमध्ये, दाखल केला नाशिकमध्ये आणि स्थानबद्ध केले रत्नागिरीत. केंद्रीय मंत्र्याला अशा पद्धतीने अटक केली जाते आणि आता माजी गृहमंत्र्याविरुद्ध लूक आऊटची नोटीस जारी होऊनही ते सापडत नाहीत, हे पटत नाही. वकील, अधिकाऱ्याला अटक झाली आणि आरोपी फरार आहे, असे प्रथमच घडत असावे. त्यामुळे त्यांनी स्वत: हजर झाले पाहिजे. ते कुठे आहेत, हे पोलिसांना माहिती असेल, असा दावाही शिंदे यांनी केला.