गांजीभोयरेतील कोविड सेंटरचा ग्रामस्थांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST2021-05-15T04:20:10+5:302021-05-15T04:20:10+5:30
जवळे : शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांना नि:शुल्क सेवा मिळावी यासाठी पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथील जिल्हा परिषद ...

गांजीभोयरेतील कोविड सेंटरचा ग्रामस्थांना दिलासा
जवळे : शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांना नि:शुल्क सेवा मिळावी यासाठी पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथील जिल्हा परिषद शाळेत सुरू करण्यात आलेल्या केविड सेंटरचा ग्रामस्थांना दिलासा मिळत आहे.
येथील कोविड सेंटरचे लोकनेते आमदार निलेश लंके असे नामकरण करण्यात आले आहे. १९ पैकी ५ रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
गांजीभोयरे येथील दादाभाऊ आनंदा झंझाड यांच्या प्रयत्नातून व मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने २८ एप्रिल रोजी हे कोविड सेंटर सुरू झाले.
यावेळी झंझाड म्हणाले, सर्वसामान्य जनतेला कोरोनावर चांगल्यापैकी उपचार मिळावेत यासाठी हे कोविड सेंटर सुरू केले आहे. येथे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. दाखल होणाऱ्या रुग्णांना दोन वेळेचे जेवण, नाश्ता, औषधे मोफत दिली जातात. येथील रुग्णांची दररोज सकाळ, संध्याकाळ डॉ. सोमेश्वर आढाव यांच्यामार्फत तपासणी केली जाते. तसेच योग्य सल्ला देण्यात येतो.
कोविड सेंटरला आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. कविता पठारे, सचिन सोनवणे, दिव्या शेंडगे, शुभांगी निंबाळकर, सुवर्णा दांडगे, मोहन शिंदे, आयुब इनामदार, ग्रामसेवक शशिकांत नरवडे, भास्कर भगत यांचे विशेष सहकार्य लाभत आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सरपंच अनिता बाचकर, उपसरपंच आनंदा झंझाड उपस्थित होते.
---
१४ गांजीभोयरे
गांजीभोयरे येथील कोविड सेंटरमधून सोमवारी बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आले. यावेळी सरपंच अनिता बाचकर उपसरपंच आनंदा झंझाड व इतर.