महसूलमंत्री थोरात यांच्याकडून नागरे, खांबेकर कुटुंबीयांचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST2020-12-29T04:19:45+5:302020-12-29T04:19:45+5:30

कोपरगाव : राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोपरगाव येथील शिक्षणप्रेमी स्व.लहानुभाऊ नागरे तसेच जिल्हा काँग्रेसचे ...

Consolation to Nagre, Khambekar family from Revenue Minister Thorat | महसूलमंत्री थोरात यांच्याकडून नागरे, खांबेकर कुटुंबीयांचे सांत्वन

महसूलमंत्री थोरात यांच्याकडून नागरे, खांबेकर कुटुंबीयांचे सांत्वन

कोपरगाव : राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोपरगाव येथील शिक्षणप्रेमी स्व.लहानुभाऊ नागरे तसेच जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व शिर्डी संस्थांनचे माजी विश्वस्त स्व. अशोकराव खांबेकर यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट देऊन दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी संजय नागरे, स्वरूपखांबेकर यांच्यासह दोनही कुटुंबीयांचे सदस्य उपस्थित होते. मंत्री थोरात यांनी स्व.लहानुभाऊ नागरे व स्व.अशोक खांबेकर यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. दोघेही अत्यंत अभ्यासू व जाणकार व्यक्तीचे अकस्मात जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याचा शोक व्यक्त केला.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे, विष्णूपंत पाडेकर, ॲड. शीतल देशमुख, रेखा जगताप, ज्ञानेश्वर भगत, अक्षय आंग्रे, सागर बारहाते, निरंजन कुडेकर, जय कदम, आशपाक सय्यद, राजू पठाण, दादा आवारे, रौनक अजमेरे, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

................

फोटो२८- मंत्री थोरात, कोपरगाव.

281220\fb_img_1609109634801.jpg

??????? ???? ???. ??????? ??????? ??????? ???????????? ??????? ?????? ????? ?????? ????????? ?????, ????? ????? ????.

Web Title: Consolation to Nagre, Khambekar family from Revenue Minister Thorat