मोदी सरकार विरुद्ध काँग्रेसचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:32+5:302021-06-02T04:17:32+5:30
नासीर शेख म्हणाले, केंद्र सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून डिझेल, पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी हवालदिल ...

मोदी सरकार विरुद्ध काँग्रेसचे धरणे
नासीर शेख म्हणाले, केंद्र सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून डिझेल, पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी हवालदिल आहेत. सुशिक्षित बेरोजगार हतबल झाला आहे. व्यापारी वर्ग निराशेच्या गर्तेत सापडला आहे. सर्वसामान्य जनता रडकुंडीला आली आहे. केंद्र सरकार नकारात्मक रीतीने वागत असून, दुटप्पीपणाचे धोरण अवलंबत आहे. गेल्या सात वर्षांपासून देश केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वेगळ्यावेगळ्या प्रश्नांनी त्रस्त झाला असून, सर्वत्र निराशेचे वातावरण आहे. केंद्र सरकारने आता पायउतार होण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. आंदोलनात अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सहचिटणीस प्राध्यापक जालिंदर काटे, नवाबभाई शेख, नासिर शेख, प्रकाश शेलार, किशोर डांगे, रवींद्र पालवे, गणेश दिनकर, आदिनाथ देवढे, सुभाष क्षेत्रे आदी सहभागी झाले होते.
010621\img-20210601-wa0043 (1).jpg
पाथर्डी तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने देशातील ढासळती अर्थव्यवस्था,कोरोना रोखण्यात आलेले अपयश,इंधन दरवाढ,फसलेली नोटबंदी,शेतकरी विरोधी कायदे आदी मुद्द्याच्या अनुषंगाने येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणे आंदोलन करण्यात आले.