राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पुन्हा उभारी घेईल- बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 13:15 IST2017-12-25T13:14:49+5:302017-12-25T13:15:25+5:30
गुजरातची निवडणूक देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळविले. हा काँग्रेसचा नैतिक विजय असून आगामी काळात काँग्रेस पुन्हा देशात क्रमांक एकचा पक्ष होईल, असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पुन्हा उभारी घेईल- बाळासाहेब थोरात
संगमनेर : गुजरातची निवडणूक देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळविले. हा काँग्रेसचा नैतिक विजय असून आगामी काळात काँग्रेस पुन्हा देशात क्रमांक एकचा पक्ष होईल, असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडण्याची सर्वस्वी जबाबदारी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर होती. गुजरातमध्ये कॉँगेस पक्षाच्या दमदार वाटचालीत महत्वपूर्ण भुमिका बजावलेले आमदार थोरात यांचा रविवारी संगमनेरात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, कॉँगेस शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, नवनाथ अरगडे, अशोक भुतडा, रुपाली औटी, सोनाली शिंदे, किशोर पवार, बाळासाहेब पवार, श्याम भडांगे, अरिफ देशमुख, रिजवान शेख, निखील पापडेजा, रामाहरी कातोरे, डॉ. दानिश शेख, अॅड. सुहास आहेर, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, नामदेव कहांडळ आदी उपस्थित होते.