शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वंचित आघाडीला सोबत घेण्यास काँग्रेस इच्छुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 02:28 IST

बाळासाहेब थोरात : मनसेबाबत मात्र द्विधा मनस्थिती

शिर्डी : लोकसभा निवडणुकीत पारंपरिक मतांना धक्का बसल्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास इच्छुक आहे़ मात्र राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्याबाबत द्विधा मनस्थितीत आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रविवारी थोरात यांनी साईदरबारी हजेरी लावली़ पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, वंचितमुळे लोकसभेत ९ जागांवर काँग्रेस-राष्टÑवादीला फटका बसला़ त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत सर्व धर्मनिरपेक्ष व पुरोगामी शक्तींना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या सभांना लाखोंची गर्दी होती. मात्र ही गर्दी मतात परावर्तित होऊ शकली नाही. त्यामुळे मनसेला सोबत घेण्याबाबत पक्षात द्विधा मनस्थिती आहे. जागा वाटपाबाबत मनसेकडून अद्याप प्रस्तावही आलेला नाही. मनसेला सोबत घ्यायचे की कसे, याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होईल, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक व गोव्यात भाजपकडून सुरू असलेला प्रकार दुर्दैवी, लोकशाहीला घातक व सामान्य जनतेला आवडणारा नसल्याचे सांगून सर्वसामान्यांना शंका असेल तर निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही थोरात यांनी केली़

विमानातील भेटीचा विखेंचा योगायोगखासदार डॉ़ सुजय विखे व तुम्ही विमानात सोबत प्रवास केल्याचे फोटो माध्यमात झळकले़ या भेटीत आपसात काय चर्चा झाली. याबाबत त्यांना छेडले असता, तो केवळ योगायोग होता. व्यक्तीद्वेषाला कधीही स्थान देत नसल्याने आपण खासदार विखेंचे विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच वडीलकीच्या नात्याने चांगले काम करण्याचा सल्लाही दिल्याचे थोरात यांनी सांगितले़

टॅग्स :congressकाँग्रेसMNSमनसेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी