नेवासा येथे काँग्रेस बळकटीकरण सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:44+5:302021-02-06T04:38:44+5:30
नेवासा : येथे काँग्रेस बळकटीकरण सप्ताह निमित्ताने आयोजित बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पक्षाला तळागाळात नेण्यासाठी जोमाने कामाला लागावा, ...

नेवासा येथे काँग्रेस बळकटीकरण सप्ताह
नेवासा : येथे काँग्रेस बळकटीकरण सप्ताह निमित्ताने आयोजित बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पक्षाला तळागाळात नेण्यासाठी जोमाने कामाला लागावा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे यांनी केले. महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र नागवडे होते. काँग्रेसचे काँग्रेस कमिटीचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, अंकुशराव कानडे, जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे, प्रभारी सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, गणपतराव सांगळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे व्यासपीठावर उपस्थित होते.
शहराध्यक्ष रंजन जाधव यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष संभाजीराव माळवदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कोरोनाच्या काळात नेवासा तालुक्यात योगदान देणाऱ्यांचा सन्मान कोरोना योद्धा पुरस्काराने करण्यात आला. वडाळा बहिरोबा येथील जयवंत मोटे, नेवासा येथील पत्रकार सुहास पठाडे, शंकर नाबदे, अभिषेक गाडेकर, उमा गायकवाड, मिलका बनकर, पोलीस कॉन्स्टेबल तुळशीराम गीते, सुहास गायकवाड, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष रंजनदादा जाधव, अरुण जाधव, उत्कृष्ट सेवेबद्दल सहायक फौजदार बाळासाहेब घुगरकर, उमा गायकवाड, मिलका बनकर, पोलीस कॉन्स्टेबल तुळशीराम गीते, सुहास गायकवाड आदींचा सन्मान करण्यात आला.