श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST2021-09-05T04:24:57+5:302021-09-05T04:24:57+5:30
श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील ५४ गावांमध्ये काँग्रेस पक्षाची शाखा उघडण्यात आली आहे. प्रत्येक शाखेमध्ये समाजातील सर्व घटकांतील कार्यकर्त्यांना स्थान ...

श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेस
श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील ५४ गावांमध्ये काँग्रेस पक्षाची शाखा उघडण्यात आली आहे. प्रत्येक शाखेमध्ये समाजातील सर्व घटकांतील कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले आहे, अशी माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.
काँग्रेस पक्ष बळकटीकरण कार्यक्रमांतर्गत श्रीरामपूर तालुक्यामध्ये गाव तेथे काँग्रेस या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा तालुक्यामध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्ताने दौरा झाला. या दौऱ्यामध्ये मंत्री थोरात यांनी आमदार कानडे यांच्या कार्यालयाला भेट दिली. तालुक्याच्या प्रत्येक गावांमध्ये करण्यात आलेल्या काँग्रेसच्या शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
काँग्रेसच्या शाखा पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन बांधणीबाबत आमदार कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात मार्गदर्शन करण्यात आले. येणाऱ्या काळात बूथ कमिटी सक्षम करण्यासाठी पक्ष सर्व ताकदीनिशी पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही कानडे यांनी दिली. मंत्री थोरात यांच्या हस्ते अध्यक्षांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध शाखा अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार लहू कानडे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, कार्याध्यक्ष सचिन गुजर, सरचिटणीस माऊली मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, सचिव ॲड. समीन बागवान, तालुका उपाध्यक्ष सतीश बोर्डे, अभिजित लिपटे, राजू औताडे, आकाश क्षीरसागर, अक्षय नाईक, सोमनाथ पाबळे, अर्जुन भालेराव, सुरेश पवार, आबा पवार, हरिभाऊ बनसोडे, रमेश आव्हाड, महेबुब शेख उपस्थित होते.
---