शेतकरी कायद्याविरोधात राहुरीत काँग्रेसची बचाव रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 14:56 IST2020-10-18T14:55:19+5:302020-10-18T14:56:10+5:30
केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. बाजार समिती व्यवस्था संपुष्टात आणून साठेबाजी काळाबाजार करणार्यांना मोकळे रान मिळणार आहे. या विरोधात राहुरीत शनिवारी काँग्रेसची रॅली काढण्यात आली होती.

शेतकरी कायद्याविरोधात राहुरीत काँग्रेसची बचाव रॅली
वळण : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. बाजार समिती व्यवस्था संपुष्टात आणून साठेबाजी काळाबाजार करणार्यांना मोकळे रान मिळणार आहे. या विरोधात राहुरीत शनिवारी काँग्रेसची रॅली काढण्यात आली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात आमदार डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पाटील, आमदार लहुजी कानडे यांच्या नेतृत्वामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती युवक काँग्रेसचे शरद निरंजन पवार यांनी दिली. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचे विरोधी कायदे करीत आहे. हे कायदे उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना उद्योगपतीचे गुलाम बनवत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्रभर या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावेळी सुभाष निशाणे, सुनील भालके, कृष्णा पवार, कैलास रेवाळे, दादा गुरसळ, बंटी जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. |