शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच आमने-सामने उभे ठाकण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 17:15 IST

लोकसभेची निवडणूक पुढील वर्षभराने होणार असली तरी नववर्षाच्या प्रारंभीच जिल्ह्यात लोकसभेचे ढोल वाजू लागले आहेत. काँग्रेसकडून विखे इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. 

अहमदनगर : लोकसभेची निवडणूक पुढील वर्षभराने होणार असली तरी नववर्षाच्या प्रारंभीच जिल्ह्यात लोकसभेचे ढोल वाजू लागले आहेत. काँग्रेसकडून विखे इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. शिर्डी मतदारसंघ आरक्षित असल्याने सर्वच राजकीय पक्षांची मदार दक्षिणेवर आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे हे सर्वश्रुत आहे. पण, राष्ट्रवादीकडून एकही चेहरा समोर आलेला नाही. काँग्रेसचे डॉ. सुजय विखे यांनी मात्र निवडणूक मैदानात उतरण्याची घोषणा करून टाकली आहे. त्यामुळे दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या मैदानात कोण उतरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.नगर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. शिर्डी व नगर दक्षिण लोकसभा. शिर्डी मतदारसंघ आरक्षित आहे. एकमेव दक्षिण मतदारसंघ खुला आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेहमीच काँटे की टक्कर पाहायला मिळते. निवडणूक वर्षभराने असली तरी आतापासून वातावरण तापू लागले आहे. वास्तविक पाहता दक्षिणेची जागा राष्ट्रवादीकडे आहे़ काँग्रेस- राष्ट्रवादीची जिल्ह्यात आघाडी आहे़ जिल्हा परिषदेत दोन्ही पक्ष एकत्र नांदतात. असे असले तरी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी दक्षिणेतून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने चर्चेचे मोहोळ उठले आहे. दक्षिणेतील विखे समर्थकांमध्ये यामुळे कमालीचा उत्साह संचारला आहे. दक्षिणेची जागा आमच्याकडे आहे आणि आम्ही मैदानात उतरणार, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने दक्षिणेतील कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा, या तालुक्यात मेळावे घेऊन नुकतीच जाहीर केली आहे. दक्षिणेत राष्ट्रवादीही सक्रिय झाल्याने विखे कुठल्या चिन्हावर निवडणूक लढविणार, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. येत्या १९ जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नगर जिल्ह्यात येत आहेत. ते काय गुगली टाकतात, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यात सेनाही यावेळी वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे. पण, विखे यांना शह देण्याएवढ्या ताकदीचा उमेदवार सध्या तरी सेनेकडे नाही़ भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी पुन्हा उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे सेना- भाजपाचे स्वतंत्र उमेदवार असतील का, राष्ट्रवादी कुणाला संधी देणार आणि विखे कोणत्या चिन्हावर लढणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSujay Vikheसुजय विखे