कॉग्रेसने यापुर्वीच आंदोलन करण्याची गरज होती - अशोक विखे
By Admin | Updated: June 1, 2017 15:27 IST2017-06-01T15:27:48+5:302017-06-01T15:27:48+5:30
कॉग्रेस पक्षाने शेतीमालाच्या भावाची जाण लक्षात घेऊन यापुर्र्वीच आंदोलन सुरु करण्याची गरज होती

कॉग्रेसने यापुर्वीच आंदोलन करण्याची गरज होती - अशोक विखे
ल कमत आॅनलाइन राहाता (अहमदनगर) दि.१कॉग्रेस पक्षाने शेतीमालाच्या भावाची जाण लक्षात घेऊन यापुर्र्वीच आंदोलन सुरु करण्याची गरज होती, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे यांनी केली. अशोक विखे पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कॉग्रेस सरकारला विरोधक म्हणून शेतक-यांचे काहीही देणेघेणे राहिलेले दिसत नाही. शेतकरी संपावर जात असताना सरकार व विरोधकांनी मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचेही ते म्हटले. पुणतांबा येथील शेतकरी संपाच्या केंद्रस्थानी सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी दाखल होत आहेत. शिर्डीत पहाटेच्या सुमारास शिवप्रहार संघटनेने टँकर व वाहनांमधील दूध रस्त्यावर ओतून दिले. राहाता बाजार समितीत शुकशुकाट होता. तालुक्यातील सर्वच आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आले होते.