काँग्रेसला आत्मचिंतनाची गरजच नाही - विखे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 04:20 IST2019-05-26T04:19:29+5:302019-05-26T04:20:25+5:30
प्रत्येक पराभवानंतर आत्मचिंतन करण्याचे बोलले जाते मात्र आता राज्यात काँग्रेसला आत्मचिंतनाचीही गरज राहिली नाही.

काँग्रेसला आत्मचिंतनाची गरजच नाही - विखे
शिर्डी : प्रत्येक पराभवानंतर आत्मचिंतन करण्याचे बोलले जाते मात्र आता राज्यात काँग्रेसला आत्मचिंतनाचीही गरज राहिली नाही. कारण काँग्रेसकडून लोकांच्या अपेक्षा आता संपल्या आहेत, अशी जळजळीत टीका ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी केली.
साईदर्शनासाठी शिर्डीत आलेल्या विखे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला़ नेत्यांना लोकांच्या भावना पहिल्यापासूनच समजल्या नाहीत़ नेते मंडळी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत बसली, यामुळे पक्षाचा सामान्य कार्यकर्ता दूर गेला. नेत्यांवर विसंबून असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याचे आता एवढ्या मोठ्या पराभवानंतर भविष्य काय ही चिंतेची बाब असल्याचे विखे म्हणाले.
>भाजप प्रवेशाचे संकेत
भाजप प्रवेशाबाबत त्यांना छेडले असता जनभावनेचा आदर करू, असे सूचक वक्तव्य करून भाजप प्रवेशाचे संकेत विखे यांनी दिले़