जिल्हा नियोजनात कॉंग्रेस - राष्ट्रवादीची सरशी , भाजपाची मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 16:33 IST2017-08-23T16:31:38+5:302017-08-23T16:33:18+5:30
अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत कॉग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी मिळवत तब्बल प्रत्येकी ११ जागा मिळवल्या. त्याखालोखाल भाजपाने ९ जागा मिळवल्या तर सेनेला फक्त एका जागेवर विजय मिळविता आला

जिल्हा नियोजनात कॉंग्रेस - राष्ट्रवादीची सरशी , भाजपाची मुसंडी
अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत कॉग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी मिळवत तब्बल प्रत्येकी ११ जागा मिळवल्या. त्याखालोखाल भाजपाने ९ जागा मिळवल्या तर सेनेला फक्त एका जागेवर विजय मिळविता आला. जिल्हा नियोजन समिती सदस्यची मतमोजणी प्रक्रिया आज मुख्य निवडणूक अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या मुख्य उपस्थितीत सैनिक लॉन येथे पार पडलि. मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या ३६ जागांसाठी मतदान पार पडले होते. तब्बल ९७ टक्के मतदान झाले होते.
आज सकाळी मतमोजणीस सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये भाजपचे ९, काँग्रेसचे ११, राष्ट्रवादीचे ११, क्रांतिकारी पक्षाचे २, सेना १, जनशक्ती १ तर महाआघाडीचा १ उमेदवार विजयी झाला. या निवडणुकीमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषद महिला सर्वसाधारण प्रवगार्तील ९ जागांसाठी १० उमेदवार होते. जिल्हा परिषद सर्वसाधारण गटासाठी एकूण ८ जागा होत्या. सर्वसाधारण गटातून काँग्रेसचे राजेश परजणे, भाजपाचे जालिंदर वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्र्रभावती ढाकणे तर जनशक्तीच्या हर्षदा काकडे व सुधाकर दंडवते यांनी विजय मिळविला. शिवसेनेच्या पुष्पा वराळ, शरद झोडगे व गुलाबराव तनपुरे यांना पराभव स्विकारावा लागला. नागरिकांचा मागास प्रवगार्साठी ५ जागेसाठी ६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये रामहरी कातोरे, सुनील गडाख, शिवाजी गाडे, दत्तात्रय काळे व प्रताप शेळके यांनी विजय मिळविला. शिवसेनेचे नेते अनिल कराळे यांना पराभव स्विकारावा लागला. नगरपंचायत मतदार संघातील खुल्या गटात १ महिलेसाठी आरक्षित असणा-या जागेवर सोनाली नायकवाडी विजयी झाल्या. नगरपालिका सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असणा-या जागेवर राष्ट्रवादीच्या उषाबाई तनपुरे विजयी झाल्या. नगरपालिका अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागेवर संतोष कांबळे हे महाआघाडीचे उमेदवार विजयी झाले असून त्यांनी चंद्रकला डोळस यांचा पराभव केला. नगरपालिकेतील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेवर महाआघाडीच्या स्नेहल खोरे विजयी झाल्या त्यांनी मंगला गाडेकर यांना पराभूत केले.
- विजयी उमेदवार :
जिल्हा परिषद महिला सर्वसाधारण प्रवर्ग -
राजश्री घुले (राष्ट्रवादी काँग्रेस), आशा दिघे (काँग्रेस), अनुराधा नागवडे (काँग्रेस), रोहिणी निघुते (काँग्रेस), सुप्रिया पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), सुनिता भांगरे (भाजप), राणी लंके (शिवसेना), दिपाली गिरमकर (भाजपा) आणि विमल आगवण (राष्ट्रवादी काँग्रेस)
जिल्हा परिषद सर्वसाधारण गट -
राजेश परजणे (काँग्रेस) जालिंदर वाकचौरे (भाजपा), प्रभावती ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस), हर्षदा काकडे व सुधाकर दंडवते (जनशक्ती)
नागरिकांचा मागास प्रवर्ग -
रामहरी कातोरे, सुनील गडाख, शिवाजी गाडे, दत्तात्रय काळे व प्रताप शेळके
नगरपंचायत मतदार संघातील खुला गट - सोनाली नायकवाडी
नगरपालिका सर्वसाधारण महिला गट - उषाबाई तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
नगरपालिका अनुसूचित जाती - संतोष कांबळे
नगरपालिका नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - स्नेहल खोरे (महाआघाडी)