कर्जत येथे काँग्रेसचे आंदोलन

By | Updated: December 5, 2020 04:36 IST2020-12-05T04:36:36+5:302020-12-05T04:36:36+5:30

कर्जत : केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके मंजूर केल्याच्या निषेधार्थ कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले. दिल्ली ...

Congress agitation at Karjat | कर्जत येथे काँग्रेसचे आंदोलन

कर्जत येथे काँग्रेसचे आंदोलन

कर्जत : केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके मंजूर केल्याच्या निषेधार्थ कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले. दिल्ली येथील पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृषी क्षेत्रासंदर्भात तीन विधेयके मंजूर केली. ही तीनही कायदे शेतकरीविरोधी आहेत. हे कायदे रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी केली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.

यावेळी कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील, युवक काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे अध्यक्ष सचिन घुले, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र धांडे, तात्यासाहेब ढेरे, अशोकराव जगताप, भाऊसाहेब सुपेकर, भास्कर भैलुमे, भाऊसाहेब तोरडमल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ०३

कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसने शेतकरी कायद्याविरोधात आंदोलन केले.

Web Title: Congress agitation at Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.