नगरच्या जागेसाठी गडकरींना साकडे

By Admin | Updated: August 19, 2014 23:27 IST2014-08-19T23:09:26+5:302014-08-19T23:27:16+5:30

अहमदनगर: शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर भाजपाने दावा केला असून, ही जागा भाजपाला मिळावी, अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली़

Congratulate the Gadkars for the space of the city | नगरच्या जागेसाठी गडकरींना साकडे

नगरच्या जागेसाठी गडकरींना साकडे

अहमदनगर: शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर भाजपाने दावा केला असून, ही जागा भाजपाला मिळावी, अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोमवारी निवेदनाव्दारे केली़
नगर शहराच्या जागेची मागणी करत भाजपाचे शहर उपजिल्हाध्यक्ष अनिल गट्टानी यांच्यासह शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले़ निवेदनात नमूद आहे,की शहर भाजपाला परिवर्तन हवे आहे़मात्र शहराची जागा गेली पंचवीसवर्षे एकच पक्ष आणि एकच उमेदवार, असे समीकरण आहे़ ते बदलणे गरजेचे आहे़ कारण युती सरकारने गेल्या पंचवीस वर्षांत शहरात काय विकास केला, असे नागरिक विचारतात़ शहराचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,औद्योगिक विकास रखडला आहे़याविषयी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर आपल्याकडे नसून, शहरातील भाजपाच्या कार्यकर्त्यांची कुचंबना होत आहे़ केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यास विकासाला गती मिळेल, हे भाजपाचे सूत्र आहे़ हे सूत्र नगर शहरातही पक्षाने लागू करावे आणि एकाच पक्षाचा खासदार व आमदार व्हावा, अशी पदाधिकाऱ्यांची धारणा आहे़
मतदारांनी परिवर्तनाचा नारा दिल्यास काय चमत्कार होतो, आपण अनुभवले आहे़ त्यामुळे शहरातील जागेबाबत पक्षाने व्यवहारिक दृष्टीने निर्णय घ्यावा, असे निवेदनात नमूद आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Congratulate the Gadkars for the space of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.