ग्रामपंचायत निवडणुकांत संघर्ष टाळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:16 IST2020-12-26T04:16:42+5:302020-12-26T04:16:42+5:30
श्रीरामपूर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक आपापसांत समन्वय ठेऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे ...

ग्रामपंचायत निवडणुकांत संघर्ष टाळावा
श्रीरामपूर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक आपापसांत समन्वय ठेऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले आहे. मात्र निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनसेवा मंडळाकडून ती लढावी असेही विखे यांनी स्पष्ट केले. येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालायत विखे यांनी भाजप पदाधिकारी व समर्थकांची बैठक बोलवली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, माजी सभापती दीपक पटारे, नानासाहेब शिंदे, डॉ. नितीन आसने, अशोकचे संचालक बबन मुठे, भाजप शहराध्यक्ष मारुती बिंगले, गणेश राठी, नगरसेवक बाळासाहेब गांगड, केतन खोरे, नगरसेवक जितेंद्र छाजेड, सुनील वाणी आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी संवादाचे यावेळी प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी गणेश मुदगुले, विश्वनाथ मुठे, नितीन आसने, भाऊसाहेब बांद्रे, मनोज छाजेड, सतीश सौदागर आदी उपस्थित होते.
----------