सुशांत घोडके यांनी सुचविलेल्या संकल्पनेची मुख्यमंत्र्यांकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:49+5:302021-04-18T04:20:49+5:30
कोपरगाव : दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात लोकसहभागातून विलगीकरण कक्ष उभारणी केली ...

सुशांत घोडके यांनी सुचविलेल्या संकल्पनेची मुख्यमंत्र्यांकडून दखल
कोपरगाव : दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात लोकसहभागातून विलगीकरण कक्ष उभारणी केली आहे. नागरिकांनी व्यक्तिगत घ्यावयाची काळजी याबाबत ई-मेलव्दारे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समन्वयक सुशांत घोडके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही संकल्पना सुचविल्या होत्या. त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी थेट राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे त्या पाठविण्यात आल्या आहेत.
घोडके यांनी शहरी व ग्रामीण भागात व लोकसहभागातून विलगीकरण कक्ष उभारणीबाबत १८ उपाययोजना मुद्दे, तर नागरिकांनी कोरोना नियंत्रणासाठी व्यक्तिगत घ्यावयाची काळजी याबाबत २१ मुद्दे १५ दिवसांपूर्वी कळविले होते. हे मुद्दे प्रभावीपणे वाटल्याने मुख्यमंत्री यांनी दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागास कळवले आहे. कोरोना नियंत्रणासाठी शिर्डी उपविभागात व कोपरगाव तालुक्यात सुरुवातीपासून स्वच्छतादूत घोडके अहोरात्र महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. परिस्थिती नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजनासंदर्भात प्रधानमंत्री यांनाही याविषयी माहिती पाठवली आहे.