संगणक परिचालकांनी केली शासन निर्णयाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST2021-02-05T06:42:37+5:302021-02-05T06:42:37+5:30
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तसेच राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी नियुक्तीची मागणी केलेली असताना संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान ...

संगणक परिचालकांनी केली शासन निर्णयाची होळी
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तसेच राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी नियुक्तीची मागणी केलेली असताना संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीला बगल देऊन आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात सुमारे ३९२ कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला परत काम दिले आहे. संगणक परिचालकांच्या मानधनात १००० रुपये वाढ करून जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे. शासनाने १४ जानेवारी २०२१ रोजीच्या दोन्ही शासन निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयांसमोर काळ्या फिती लावत निदर्शने करून शासन निर्णयाची होळी केली. शासन निर्णय त्वरित रद्द न केल्यास लवकरच मुंबईत आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश निर्मळ यांनी यावेळी सांगितले.
..
२५संगमनेर होळी
...
ओळी-संगमनेर पंचायत समिती कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करताना संगणक परिचालक.