मनमाड-शिर्डी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

By Admin | Updated: February 17, 2024 15:51 IST2014-05-15T23:19:47+5:302024-02-17T15:51:00+5:30

भाऊसाहेब येवले, राहुरी मनमाड-शिर्डी या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, दिल्ली येथील रेल्वेच्या सुरक्षा समितीच्या अधिकार्‍यांनी नुकतीच विद्युत रेल्वेची चाचणी घेतली.

Complete electrification of Manmad-Shirdi railway line | मनमाड-शिर्डी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

मनमाड-शिर्डी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

 भाऊसाहेब येवले, राहुरी मनमाड-शिर्डी या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, दिल्ली येथील रेल्वेच्या सुरक्षा समितीच्या अधिकार्‍यांनी नुकतीच विद्युत रेल्वेची चाचणी घेतली. साधारण चार महिन्यांत या मार्गावर विद्युत रेल्वे धावण्याची शक्यता आहे. शिवाय या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येणार आहे. तसे झाल्यास शिर्डीसाठी देशभरातून रेल्वेगाड्या वाढणार असून, भक्तांचा ओघही आपोआपच वाढेल. शिर्डी या धार्मिकस्थळाचे महत्व आता जगभर पसरले आहे. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येथ ेहजेरी लावत असतात. भाविकांची ही वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने गाड्या वाढविण्याचे नियोजन केले आहे़ शिवाय या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी येत्या बजेटमध्ये तरतूद करण्यात येणार आहे़ शिर्डीसाठी चाळीस रेल्वे गाड्यांची प्रस्तावात तरतूद आहे़ त्यामुळे भविष्यकाळात रेल्वेने येणार्‍या भाविकांत भर पडणार आहे. शिवाय शनिशिंगणापूर येथेही भक्तांची वर्दळ वाढेल. मनमाड ते शिर्डी या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर नुकतीच विद्युत रेल्वेची चाचणी घेण्यात आली़ दिल्ली येथून आलेल्या रेल्वेच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी चाचणी घेऊन या मार्गाची पाहणी केली. कामात काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला कळले जाईल, अन्यथा विद्युत रेल्वेला हिरवा कंदील मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे सुरक्षा विभागाच्या परवानगीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे हालचाली मंदावल्या होत्या़ आता नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रक्रियेला गती येणार आहे. दुसर्‍या टप्प्याचे ८० टक्के काम दुसर्‍या टप्प्यातील दौंड ते पुणे या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचेही ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामार्गावर ९ ते १० रोहित्र असणार आहेत़ हे कामही अंतिम टप्प्यात असून साधारण वर्षभरात या मार्गाची चाचणी घेण्यात येईल. त्यामुळे पुणे-मनमाड या मार्गाने जाणार्‍या रेल्वे गाड्यांना गती येईल. शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने ते एक महत्वाचे पाऊल ठरेल, असे जिल्हा प्रवाशी संघटनेच्या अध्यक्षा सुचेता कुलकर्णी यांनी सांगितले़

Web Title: Complete electrification of Manmad-Shirdi railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.