विकासकामे मुदतीतच पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:32+5:302021-07-21T04:15:32+5:30
दहिगावने : कोणत्याही कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये, कामातील दिरंगाई कमी करून लोकाभिमुख कामांना विशेष प्राधान्य कोणत्याही कामाच्या दर्जाबाबत ...

विकासकामे मुदतीतच पूर्ण करा
दहिगावने : कोणत्याही कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये, कामातील दिरंगाई कमी करून लोकाभिमुख कामांना विशेष प्राधान्य कोणत्याही कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये, कामातील दिरंगाई कमी करून लोकाभिमुख कामांना विशेष प्राधान्य द्या. कामे निर्धारित वेळेतच पूर्ण करा, अशा सूचना शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी दिल्या.
सोमवारी (दि.१९) दहिगावने गटातील ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी- पदाधिकारी आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची समन्वय सभा पंचायत समितीच्या लोकनेते मारुतराव घुले पाटील सभागृहात घेण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश थोरात, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार, गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड, दहिगावने गटातील सरपंच सुभाष पवार, आबासाहेब काळे, संतोष चव्हाण, काकासाहेब काळे, अण्णाभाऊ जगधने, शरद सोनवणे, गोकुळ भागवत, संतोष धस, जालिंदर काळे, शफिक सय्यद आदींसह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामसेवक उपस्थित होते. सभेत विविध विषयांवर चर्चा करीत सभापतींनी अधिकाऱ्यांना कामांबाबत सूचना केल्या. विविध विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करणे, टेंडर करणे, अपूर्ण काम, नवीन कामे मुदतीत पूर्ण करणे, तसेच विहित कालावधीमध्ये कामे पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
...................
कोरोनाकाळात रखडलेल्या विकासकामांना गती देणे आवश्यक आहे. त्यासाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय असायला हवा. ग्रामपंचायतींच्या विकासकामांसंदर्भातील अडचणी, प्रश्न थेट समजून घेण्यासाठी व ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटाप्रमाणे स्वतंत्र सभा मार्गदर्शक ठरतील.
-डॉ. क्षितिज घुले, सभापती, पंचायत समिती