वीेज पुरवठा सुरळीत न ठेवल्याबद्दल शेवगावच्या अभियंत्याविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 18:37 IST2019-10-16T18:36:50+5:302019-10-16T18:37:38+5:30
विधानसभा निवडणुकीच्या महत्वाच्या कामासाठी शेवगाव तहसील कार्यालयात २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी दुर्लक्ष केल्याने येथील महावितरणचे अभियंता एस. एम.लोहारे यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वीेज पुरवठा सुरळीत न ठेवल्याबद्दल शेवगावच्या अभियंत्याविरुध्द गुन्हा
शेवगाव : विधानसभा निवडणुकीच्या महत्वाच्या कामासाठी शेवगाव तहसील कार्यालयात २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी दुर्लक्ष केल्याने येथील महावितरणचे अभियंता एस. एम.लोहारे यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांनी निवडणूक कामात दुर्लक्ष केल्याबद्दल लोहारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवार (दि. १६) रोजी दिले. त्यानुसार, तहसील कार्यालयातील लिपीक मनोज जाधव यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात आरोपी लोहारे यांच्या विरोधात फिर्याद दिली. विधानसभा निवडणुकीचे काम सुरळीत सुरू राहण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयात २४ तास वीज पुरवठा सुरूळीत ठेवण्याबाबत उपअभियंता तायडे यांना कळविण्यात आले होते. दि.७ आॅक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संगणक बंद पडले होते. तर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ११ आॅक्टोबर रोजी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट सरमिसळचे कामकाज सुरू असतानाही वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. वेळोवेळी नोटीस बजावूनही महावितरणने आजपावेतो खुलासा सादर केलेला नाही. त्यामुळे निवडणूक कामात जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी केकाण यांच्या आदेशानुसार उपअभियंता लोहारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजत्ीा ठाकरे करीत आहेत.