तक्रारी करा, अवैध सावकारांच्या मुसक्या आवळू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST2021-09-12T04:24:49+5:302021-09-12T04:24:49+5:30
डॉ. शेखर यांनी शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा ...

तक्रारी करा, अवैध सावकारांच्या मुसक्या आवळू
डॉ. शेखर यांनी शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, दीपाली काळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले. डॉ. शेखर यांनी सांगितले की, क्षेत्रफळाच्या दृष्टीने नगर जिल्हा मोठा आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येकी पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याकडे दोन सराईत गुन्हेगारांची जबाबदारी दिली जाईल. दोन महिन्यांत या कर्मचाऱ्यांनी उपअधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांना संबंधित गुन्हेगारांसंदर्भात अहवाल सादर करावयाचा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी करायची आहे. पोलिसांकडून नियमित तपासणी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सबंंधित गुन्हेगार हा गुन्हे करण्यापासून परावृत्त होईल. तसेच एखादा व्यक्ती परिस्थितीमुळे गुन्हेगार झाला असेल तर त्याचे समुपदेशन करून त्याला सामजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा योजनेचा उद्देश आहे. लाेकसहभागातून पोलिसिंग या दृष्टीने विभागात कामकाज राबविणार असल्याचे डॉ. शेखर यांनी सांगितले.
----------------------
टू-प्लस योजनेचे कौतुक
सराईत गुन्हगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या टू-प्लस योजनेचे डॉ. शेखर यांनी कौतुक केले. या योजनेत आणखी काही बाबींचा समावेश करून तसेच इतर अधिकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश करून ही योजना व्यापक स्तरावर राबविण्याचे संकेत त्यांनी दिले.
--------------------
जनजागृतीतूनच सायबर क्राईमला आळा बसेल
परराज्यात कुठेतरी बसून सायबर गुन्हेगार संघटितपणे गुन्हे करतात. अशा गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलीस गेले तरी ते सहजासहजी मिळून येत नाहीत. मात्र फसवणूक होऊ नये, यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. पोलिसांच्या माध्यमातून सायबर क्राईमबाबत जनजागृती केली जाणार असल्याचे डॉ. शेखर यांनी सांगितले.
---------------------------
समुपदेशनच्या माध्यमातून घरगुती हिंसाचाराला आळा
घटसस्फोट अथवा घरगुती हिंसाचाराच्या घटना काही प्रमाणात वाढत असताना पोलीस दलात असलेल्या समुपदेशन सेलच्या माध्यमातून अशा घटनांना आळा घालता जात आहे. पती-पत्नींमधील वाद मिटवून त्यांची मानसिकता एकमेकांपासून वेगळे होण्यापर्यंत जाणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
...........
फोटो ११ बी.जी शेखर