बेकायदेशीर बिगारी रजेची नुकसानभरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:22 IST2021-01-03T04:22:14+5:302021-01-03T04:22:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : नागापूर औद्योगिक वसाहतीतील क्लासिक व्हील युनिट एकमधील कामगारांना वारंवार बिगारी रजा दिली जात आहे. ...

बेकायदेशीर बिगारी रजेची नुकसानभरपाई द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नागापूर औद्योगिक वसाहतीतील क्लासिक व्हील युनिट एकमधील कामगारांना वारंवार बिगारी रजा दिली जात आहे. त्यामुळे कामगार आर्थिक अडचणीत सापडले असून, कामगारांना बिगर पगारी रजेची नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र इंजिनिअरिंग उद्योग कामगार संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
उद्योग कामगार संघटनेने सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवारी सकाळी ७ वाजता कामगार कारखान्यात आले असता त्यांना कंपनी बंद असल्याचे सांगण्यात आले. कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कारखाना बंद ठेवल्याने कामगारांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगारांना माहिती दिली गेली नाही. त्यामुळे कामगारांनी उत्पादन विभागप्रमुखाशी फोनवरून संपर्क केला असता पुढील तीन दिवस कारखाना बंद असल्याचे सांगण्यात आले. ही माहिती कामगारांनी युनियनचे प्रतिनिधी कॉ. महबुब सय्यद, भैरवनाथ वाकळे, रामदास वागस्कर यांना दिली. त्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर येऊन विचारपूस केली. त्यावर नोटीस फलकावर लावलेल्या नोटीसची छायांकित प्रत कामगार प्रतिनिधींना दिली. वास्तविक पाहता बिगारी रजेची माहिती कामगारांना देणे बंधनकारक आहे. कामगार आयुक्तांच्या परवानगीने बिगारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेणे आवश्यक होते. मात्र, कारखाना व्यवस्थापनाने परस्पर सुटी जाहीर केली असून, यापूर्वीही असे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे कामगार अर्थिक अडचणीत आले असून कामगारांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
...
- कारखान्यातील कामगारांनी काय निवेदन दिले. त्याची आपल्याला काहीही माहिती नाही. सध्या बाहेरगावी आहे. कामगारांची काय तक्रार आहे, याबाबत प्रतिनिधींशी चर्चा करून सोमवारी निर्णय घेतला जाईल.
- मुनोत, उद्योजक
.
सूचना फोटो