मयत शिक्षकाच्या वारसांना भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:40+5:302021-02-06T04:36:40+5:30
त्यामुळे शिंदे कुटुंबीयांचा उपचारादरम्यान झालेला खर्च, तसेच कर्तव्य बजावत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्याला निवडणूक आयोगाकडून केली जाणारी भरपाई देण्यात ...

मयत शिक्षकाच्या वारसांना भरपाई द्या
त्यामुळे शिंदे कुटुंबीयांचा उपचारादरम्यान झालेला खर्च, तसेच कर्तव्य बजावत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्याला निवडणूक आयोगाकडून केली जाणारी भरपाई देण्यात यावी, या मागणीचे कोपरगाव तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी (दि.४) तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले आहे.
स्व. शिंदे हे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर होते, तसेच यापूर्वी त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांनी आपल्या कार्यालयाकडे वेळोवेळी आदेश रद्द करण्यासाठी विनंती केली होती; परंतु त्याची कुठलीही दखल आपल्या कार्यालयाने न घेता त्यांचा निवडणूक आदेश कायम ठेवला. परिणामी, निवडणूक मतदानाच्या दिवशी १५ जानेवारीला सकाळी निवडणुकीचे कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर उपचारासाठी कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावर १६ जानेवारीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हासंपर्कप्रमुख अशोक कानडे यांनी यासंदर्भात आपल्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले होते; परंतु अद्यापपर्यंत कुठलीही वैद्यकीय भरपाई न मिळाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर मृत्यू हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा बळी आहे. या सर्व घटनेचा कोपरगाव तालुका शिक्षक संघटना, शिक्षकबांधव तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. सदर निवेदनाचा गांभीर्याने विचार न झाल्यास कोपरगाव तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी (दि.११) दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर अशोक कानडे, मनोहर शिंदे, चांगदेव ढेपले, विनोद सोनवणे, दत्तात्रय गरुड, शशिकांत जेजूरकर, दीपक चावरे, बाळासाहेब मोरे, वसंत भातकुडव, रमेश निकम, मोहन लामखडे, मिलिंद गुंजाळ, नवनाथ सूर्यवंशी, बाबासाहेब खरात, शरद शिंदे, सतीश जोशी, करणसिंग काकरवाल, संदीप कडू, पांडुरंग गोडे शिक्षकांच्या सह्या आहेत.