राज्य सरकारची विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:50+5:302021-07-20T04:15:50+5:30

कर्जत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने घेतलेले ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय, विविध योजना आणि झालेली विकासकामे ...

Communicate the development work of the state government to the general public | राज्य सरकारची विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

राज्य सरकारची विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

कर्जत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने घेतलेले ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय, विविध योजना आणि झालेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मृद्‌ व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील शिवसंपर्क अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, कर्जत तालुका प्रमुख बळीराम यादव, जामखेड तालुका प्रमुख संजय काशीद, महिला आघाडीच्या जिल्हा उपसंघटक कांचनबाला महावीर बोरा, जिल्हा संघटक सुनीता हिरडे, मंगल म्हस्के, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी वाकळे, अमृत लिंगडे, प्रशांत बुद्धिवंत, सुभाष जाधव, पोपट धनवडे, शिवाजी नवले, अक्षय घालमे, कुमार मांडगे, रवींद्र खेडकर, कृष्णा बामणे, सुदाम गदादे आदी उपस्थित होते.

गडाख म्हणाले, आगामी काळ मोठा परीक्षेचा आहे. कोरोनामुळे आर्थिक प्रश्न आहेतच, तरीही विकास कुठेच कमी पडणार नाही. विकासाची कामे घेऊन जनतेच्या दारात जा. कोरोनाच्या वाईट परिस्थितीत जनतेचा आधार बना, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिवसेनेच्या कर्जत तालुका प्रमुखपदी ज्येष्ठ नेते बळीराम यादव यांची निवड करण्यात आली. तसेच नियुक्तीपत्र मंत्री गडाख यांच्याहस्ते देण्यात आले.

प्रास्ताविक शिवाजी नवले यांनी केले. सावता हजारे यांनी आभार मानले.

---

१९ कर्जत गडाख

कर्जत येथे मृद्‌ व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी तालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल बळीराम यादव यांचा सन्मान केला.

Web Title: Communicate the development work of the state government to the general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.