नगरमध्ये धनशक्ती विरोधात सर्वसामान्य लढत : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 18:08 IST2019-03-13T17:54:33+5:302019-03-13T18:08:02+5:30
लोकसभा निवडणुकीत विरोधक सर्व शक्तीचा वापर करतील, मात्र आपण एकत्रितपणे त्याचा सामना करू. ही लढाई धनशक्तीविरोधात सर्वसामान्यांची असेल.

नगरमध्ये धनशक्ती विरोधात सर्वसामान्य लढत : शरद पवार
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत विरोधक सर्व शक्तीचा वापर करतील, मात्र आपण एकत्रितपणे त्याचा सामना करू. ही लढाई धनशक्तीविरोधात सर्वसामान्यांची असेल. अहमदनगरमध्ये १९९१ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
नगर येथील कार्यकर्त्यांशी पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.
पवार म्हणाले, देशाचे व राज्याचे लक्ष अहमदनगर लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. पुर्वी एकदा अशीच आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी यशवंतराव गडाख यांना काँग्रेसकडून उमेदवारी देत निवडून आणले. यावेळी तिकिटाची मागणी केली. काहींनी बाहेरचा माणूस घ्यावा, अशा मागण्या केल्या. पण आपल्याकडे त्याच्यापेक्षा चांगले उमेदवार आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. त्यांनी दोन्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली. आता त्यांनी तिसरा पर्याय निवडला आहे. आपली लढाई भाजप-सेनेविरोधात आहे. शिवसेना भाजपाला किती साथ देते हे आपल्याला माहित आहेच. विरोधातील उमेदवार अदृश्य शक्तीचांही वापर करू शकतात. त्याविरोधात आपल्याला एकसंघपणे लढाई द्यायची आहे.