श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण ट्रस्टच्या वतीने समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:34+5:302021-01-03T04:21:34+5:30

ट्रस्टच्या वतीने गठित केलेल्या समितीच्या देखरेखीखाली संगमनेर तालुक्यात निधी संकलन व जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानासाठी अभियान ...

Committee formed on behalf of Shri Ram Janmabhoomi Mandir Nirman Trust | श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण ट्रस्टच्या वतीने समिती गठित

श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण ट्रस्टच्या वतीने समिती गठित

ट्रस्टच्या वतीने गठित केलेल्या समितीच्या देखरेखीखाली संगमनेर तालुक्यात निधी संकलन व जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानासाठी अभियान प्रमुख, सहअभियान प्रमुख, तालुका निधी प्रमुख, सहनिधी प्रमुख तसेच प्रचार प्रमुख अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहे. संघटनात्मक व कार्य विभाजनासाठी तालुक्यात एकूण पाच उपखंड रचना करून त्याअंतर्गत मंडल रचना करण्यात आली आहे. कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. ३) सकाळी दहा वाजता गीता परिवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक अशोक सराफ व सहसंघचालक सुभाष कोथमिरे उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले.

Web Title: Committee formed on behalf of Shri Ram Janmabhoomi Mandir Nirman Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.