जवळा येथे बंधारा कामाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:47+5:302021-07-14T04:23:47+5:30
जवळा : माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याहस्ते जामखेड तालुक्यातील जवळा येथे सोमवारी बंधारा कामाचा प्रारंभ करण्यात आला. ...

जवळा येथे बंधारा कामाचा प्रारंभ
जवळा : माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याहस्ते जामखेड तालुक्यातील जवळा येथे सोमवारी बंधारा कामाचा प्रारंभ करण्यात आला.
पंधरा लाख रुपये खर्चाच्या साठवण बंधाऱ्याचे काम जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येणार आहे. जवळा परिसरातील शेरड ओढ्यावर होणाऱ्या या बंधाऱ्यामुळे मोठ्या स्वरूपात पाणी अडविण्याचे काम होणार आहे. या भागातील शेतीला याचा मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या जवळा गटाचे सदस्य सोमनाथ पाचारणे, माजी सभापती डाॅ. भगवान मुरुमकर, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस पांडुरंग उबाळे, ज्येष्ठ कार्यकर्ते मुरलीधर हजारे, भाजप वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष डाॅ. दीपक वाळुंजकर, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गौतम कोल्हे, प्रशांत पाटील, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, दशरथ हजारे, ग्रामपंचायत सदस्य उमेश रोडे, एकनाथ हजारे, आयुब शेख, डॉ. ईश्वर हजारे, हबीब शेख, राजेंद्र राऊत, बाबासाहेब महानवर, राजेंद्र महाजन, सोपान बोराटे, अनिल हजारे, उमेश हजारे, महावीर पोफळे, महेंद्र खेत्रे, अर्जुन रोडे, संदीप कोल्हे, राजेंद्र रोडे, यदा रोडे, पिनू रोडे, अजय बोराटे, रंगनाथ ठोंबरे, विजय कोकाटे, विलास देवमुंडे, संकेत हजारे, बंटी देवकाते, दत्ता हजारे, अदित्य कोल्हे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.