चिचोंडी पाटील येथे गाय गोठा कॉंक्रिटीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:24 IST2021-03-01T04:24:14+5:302021-03-01T04:24:14+5:30

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे गाय गोठा कॉंक्रिटीकरण कामाचा प्रारंभ जि. प. सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख ...

Commencement of cow herd concreting at Chichondi Patil | चिचोंडी पाटील येथे गाय गोठा कॉंक्रिटीकरणास प्रारंभ

चिचोंडी पाटील येथे गाय गोठा कॉंक्रिटीकरणास प्रारंभ

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे गाय गोठा कॉंक्रिटीकरण कामाचा प्रारंभ जि. प. सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या हस्ते झाला.

यावेळी इंजि. प्रवीण कोकाटे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, शिवसेना उपतालुकाप्रमुख जिवाजी लगड, शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे, डॉ. ययाती फिसके, सरपंच मनोज कोकाटे, उपसरपंच कल्पना ठोंबरे, दत्तात्रय हजारे, माजी उपसरपंच डॉ. मारुती ससे, सेवा संस्था अध्यक्ष राजेंद्र कोकाटे, माजी अध्यक्ष आर. एस. कोकाटे, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, अजय कांकरिया, भाऊसाहेब वाडेकर, अरुण दवणे, ग्रा. पं. सदस्य विश्वसागर कोकाटे, संदीप काळे, दीपक हजारे, प्रशांत कांबळे, महादजी कोकाटे, सचिन ठोंबरे, ज्ञानेश्वर ठोंबरे, गणेश वाडेकर, बबनराव शेळके, रामदास कोकाटे, किसनराव आगलावे, ग्रामविकास अधिकारी देविदास मोरे, शाखा अभियंता डेरे, दीपक मेटे, निखिल गायकवाड, अंबादास कोकाटे, राजू तनपुरे, शिवाजी कोकाटे उपस्थित होते.

प्रवीण कोकाटे यांनी शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक योजनांची माहिती दिली. राेजगार हमी योजनेंतर्गत गाय गोठा कॉंक्रिटीकरण ही योजना राबविण्यात येत आहे. यातून तालुक्यात ७० लाखांच्या निधीचे काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Commencement of cow herd concreting at Chichondi Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.