विजय दर्डा यांच्याकडून लोढा परिवाराचे सांत्वन

By Admin | Updated: May 23, 2016 01:13 IST2016-05-23T00:21:59+5:302016-05-23T01:13:04+5:30

अहमदनगर : दिवंगत उद्योगपती वीरेंद्र मोतीलाल लोढा यांच्या परिवाराची भेट घेऊन लोकमत मीडिया प्रा़ लिमिटेडचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Comfort of Lodha family by Vijay Darda | विजय दर्डा यांच्याकडून लोढा परिवाराचे सांत्वन

विजय दर्डा यांच्याकडून लोढा परिवाराचे सांत्वन

अहमदनगर : दिवंगत उद्योगपती वीरेंद्र मोतीलाल लोढा यांच्या परिवाराची भेट घेऊन लोकमत मीडिया प्रा़ लिमिटेडचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. वीरेंद्र यांच्याबाबतच्या अनेक आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला.
राजमोती एक्स्ट्रूजनच्या माध्यमातून अ‍ॅल्युमिनिअम उद्योगात देशभर नाव कमावलेले लोढा यांचे नुकतेच निधन झाले. दर्डा यांनी रविवारी नगरमध्ये येऊन लोढा परिवाराची भेट घेतली. ‘वीरेंद्र हे आपले जवळचे मित्र होते. ते अत्यंत साहसी, विनम्र व प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांच्या अकाली निधनाने परिवारासह सर्वांचीच मोठी हानी झाली आहे.
आपण एक जवळचा मित्र गमावला आहे,’ अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. दिवंगत लोढा यांच्या मातोश्री श्रीमती जयकुवरबाई, पत्नी स्मिता, मुलगी डॉ. निकिता, मुलगा मोनिशकुमार यांसह लोढा यांचे बंधू महेंद्र, सुरेंद्र व निखिलेंद्र, किशोर व सीमा दर्डा, नंदलाल भटेवरा, महावीर कटारिया, अशोक बाफना आदींची यावेळी उपस्थिती होती.
(प्रतिनिधी)

Web Title: Comfort of Lodha family by Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.