कोपरगाव : शहरातील अहमदनगर-मनमाड महामार्गावर भरधाव कंटेनरच्या धडकेत एक महाविद्यालयीन युवती ठार तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी (दि.३१) रात्री घडली. महाविद्यालयीन तरुणी ऋतुजा विजय देवकर (वय १८ , रा. टाकळी) ही जागीच ठार झाली.याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर- मनमाड महामार्गावर नगरच्या दिशेने जाणा-या भरधाव कंटेनरने क्रमांक (एच.आर ५५, एबी- ०८०१) भरधाव वेगात चालला होता. दोन तरुणी आपल्या दुचाकीवरून जात होत्या. दुचाकीला पाठीमागून कंटेनरने जोराची धडक दिली. या धडकेमुळे महाविद्यालयीन तरुणी ऋतुजा विजय देवकर (वय १८ , रा. टाकळी) ही जागीच ठार झाली तर मिताली प्रमोद कपाटे (वय १८ रा. कान्हेगाव)) ही गंभीर जखमी झाली आहे. कंटेनर ड्रायव्हरला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.
कोपरगावमधील अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 11:34 IST
शहरातील अहमदनगर-मनमाड महामार्गावर भरधाव कंटेनरच्या धडकेत एक महाविद्यालयीन युवती ठार तर दुसरी गंभीर जखमी झाली
कोपरगावमधील अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू
ठळक मुद्दे दुसरी तरुणी जखमीचालकास अटक