विसापूर कारागृहात कैद्यांच्या बराकीत कोब्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:58 IST2019-11-06T11:57:36+5:302019-11-06T11:58:28+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहात रविवारी सायंकाळी कैद्यांच्या बराकीजवळ कोब्रा जातीचा नाग आढळल्याने खळबळ उडाली.

Cobra in prison at Visapur Prison | विसापूर कारागृहात कैद्यांच्या बराकीत कोब्रा

विसापूर कारागृहात कैद्यांच्या बराकीत कोब्रा

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहात रविवारी सायंकाळी कैद्यांच्या बराकीजवळ कोब्रा जातीचा नाग आढळल्याने खळबळ उडाली.

विसापूर जेल येथे रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास कैद्यांचे वास्तव्य असणा-या बराकींजवळ पिंपळाचे झाड आहे. तेथे कारागृहाच्या मध्यभागी कोब्रा जातीचा नाग असल्याचे एका कैद्याने पाहिले. त्यांनी या बाबतीत गेटवरील सुरक्षा रक्षकांना ही माहिती दिली. कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे यांनी विसापूर येथील सर्पमित्र अशोक कराळे यांना बोलावून घेतले. कराळे यांनी शिताफीने तो नाग पकडून जेरबंद केला आहे. कराळे यांनी या नागास विसापूर फाट्याजवळील जंगलात मुक्त केले. कारागृह विसापूर जलाशयाच्या कडेला असल्याने धरण पाण्याने भरल्यानंतर कारागृह परिसरात विषारी व बिनविषारी सापांचा वावर नेहमीच वाढतो. यंदाही तशीच परिस्थिती आहे.

Web Title: Cobra in prison at Visapur Prison