शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकार एकमेकांची उणीदुणी काढण्यातच व्यस्त

By admin | Updated: June 19, 2016 23:11 IST

अकोले : दुष्काळामुळे मराठवाड्यातील लोकांचे होणारे स्थलांतर लक्षात घेऊन तत्कालीन आघाडी सरकारने समन्यायी पाणी वाटपाचा निर्णय घेतला

अकोले : दुष्काळामुळे मराठवाड्यातील लोकांचे होणारे स्थलांतर लक्षात घेऊन तत्कालीन आघाडी सरकारने समन्यायी पाणी वाटपाचा निर्णय घेतला ही समाधानाची बाब असल्याचे स्पष्ट करत जलप्रकल्प तयार होताना काम लांबले तर किंमत वाढते तशी निळवंडेची किंमत वाढली. मात्र भाजपा सरकार सिंचनाचा मुद्दा घेऊन मुद्दाम आमची बदनामी करत असून शेतकरी विरोधी युती सरकार एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील इंदोरी येथे ‘कथा निळवंडे धरणाची’या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक विठ्ठल आभाळे लिखित पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकर पिचड होते. भाजपा सरकारच्या पायगुणामुळे पाऊस पडेनासा झाला, अशी टिप्पणी पवार यांनी केली.
पुस्तक प्रकाशन सोहळा ही आगामी निवडणुकांच्या प्रचाराची नांदी ठरली. बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बचतगट चळवळीच्या उत्थानाविषयी सभागृहातून चकार शब्द न आल्याने बचतगटाच्या महिला नाराजी घेऊन सभागृहाबाहेर पडल्या. माजी मंत्री पिचड, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार वैभव पिचड, माजी आमदार चंद्रशेखर घुले, विठ्ठल आभाळे यांची मनोगते झाली. जे. डी. आंबरे, यशवंत आभाळे, गिरजाजी जाधव, सभापती अंजना बोंबले उपस्थित होते.
अच्छे दिनचे
स्वप्न फोल
पवार म्हणाले, भाजपाने दाखवलेले अच्छे दिनचे स्वप्न फोल ठरले. युती सरकारमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत आहेत. दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही. कर्ज माफीविषयी सरकार बोलायला तयार नाही. दुधाचे भाव गडगडले, बियाणाच्या किंमती वाढविल्या. डाळीचे भाव वाढले आदी बाबींचा ऊहापोह करत येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची चांगली तयारी करा, असा सल्ला त्यांनी दिला.