शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत-जामखेडला पुन्हा सहकारी साखर कारखाना; मुख्यमंत्र्यांची घोषणा, मतदारसंघाच्या अपेक्षा उंचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:36 IST

कर्जत-जामखेडला पुन्हा मंत्रिपद मिळेल ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच मतदारसंघात सहकारी साखर कारखान्याला मंजुरी देण्याचे सूतोवाचही त्यांनी केल्याने प्रचारात रंगत भरली गेली आहे. मतदारसंघात सहकारी साखर कारखान्याची निर्मिती होण्याची चर्चा यामुळे पुन्हा सुरु झाली आहे. 

विश्लेषण - अशोक निमोणकर । जामखेड : कर्जत-जामखेडला पुन्हा मंत्रिपद मिळेल ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच मतदारसंघात सहकारी साखर कारखान्याला मंजुरी देण्याचे सूतोवाचही त्यांनी केल्याने प्रचारात रंगत भरली गेली आहे. मतदारसंघात सहकारी साखर कारखान्याची निर्मिती होण्याची चर्चा यामुळे पुन्हा सुरु झाली आहे. कर्जत जामखेड मतदारसंघ मुळातच दुष्काळी पट्ट्यात आहे. त्यामुळे मोठे उद्योग व कारखाने नाहीत. अशा परिस्थितीत जनता दलाच्या नेत्या रंजना पाटील यांनी सहकार तत्वावरील साखर कारखाना काढण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. नंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब पवार यांनी जामखेड तालुक्यात सहकारी साखर कारखाना काढण्यासाठी प्रयत्न केला पण, तोही सफल झाला नाही. कर्जत तालुक्यात आबासाहेब निंबाळकर, बापूसाहेब देशमुख, भालचंद्र पाटील, आनंदराव फाळके यांनी जगदंबा सहकारी साखर कारखाना काढला. परंतु पुढे तो कर्जबाजारी होऊन लिलावात निघाला. हा कारखाना अवघ्या १९ कोटीच्या लिलावात खासगी तत्वावर विकला गेला. तोच अंबालिका म्हणून पुढे आला.माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी हळगाव येथे खाजगी कारखाना उभारला. परंतु काही दिवसांनी त्यांनी तो विकला. भीमापट्ट्यात व उजनी फुगवट्यातील पाण्यामुळे या भागात उसाचा पट्टा आहे. तसेच तालुक्यातील खैरी प्रकल्प व काही पाझर तलाव या ठिकाणी उसाचे क्षेत्र आहे. खासगी कारखाना चालतो. मात्र, सहकाराला यश आले नाही. मतदारसंघातील शेतक-यांची ऊस देताना अडवणूक होऊ नये म्हणून सहकारी तत्वावरील साखर कारखाना काढण्याची घोषणा पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रचारात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यास मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. नुकतीच सहकारी तत्वावरील सूतगिरणीला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यापाठोपाठ कारखान्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. या मतदारसंघात राम शिंदे व रोहित पवार यांच्यात चुरस आहे. पवार यांच्याकडे खासगी कारखाना आहे. त्याला पर्याय म्हणून शिंदे यांनी सहकारी साखर कारखाना काढण्याची घोषणा केली आहे. कारखाना निर्मितीचा हा मुद्दा प्रचारात कळीचा बनला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर